• +91 79723 63769
  • rajgurumvs1958@gmail.com
  • Saphale, Palghar, Maharashtra

सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!

राजगुरू ह. म. पंडित विद्यालय माजी विद्यार्थी संस्था सफाळे सर्व माजी विद्यार्थ्यांना कळवू इच्छिते की, आपल्या संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देऊन संस्थेची ध्येय, उद्दिष्टे, रचना, कार्यकारिणी, विविध उपक्रम व त्या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतात. माजी विद्यार्थी संस्थेचे सदस्य होण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या आणि फक्त 100/-रु नाममात्र फी भरून सदस्य नोंदणी करून घ्या.

संकेतस्थळाचा पत्ता :-
http://mvssaphale.org

पंचक्रोशीतील अतिशय अग्रगण्य अशी ग्रामीण शिक्षण संस्था सफाळे खेडोपाड्यातील व तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थेचे लवकरच नामकरण होणार आहे…. “डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, सफाळे”

शिक्षक भरती पवित्र पोर्टल विषयी महत्त्वाची सूचना
आपल्या शाळेच्या सर्व डी.एड. व बी.एड. पदवीधारक सर्व जाती, जमातीच्या माजी विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राजगुरू ह.म.पंडित विद्यालयात पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx

या संकेतस्थळावर लॉगिन करून माहिती भरा. आपल्या राजगुरू विद्यालयात शिक्षकांच्या एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत. तरी ज्या माजी विद्यार्थ्यांनी (डी.एड. व बी.एड. पदवी धारक) अद्याप पवित्र पोर्टलमध्ये नोंदणी केली नसेल तर कृपया लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी. नोंदणी केल्यानंतर खालील क्रमांकावर संपर्क साधावा. पवित्र पोर्टलवर फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर सदरची एक कॉपी माजी विद्यार्थी संस्थेला पाठवावी.

संपर्कासाठी क्रमांक :-
श्री. राजनकुमार राऊत – 8999691032
श्री. नितीन वर्तक – 9226205095
श्री. रमाकांत घरत – 8308981768