• +91 7972363769
  • rajgurumvs1958@gmail. com
  • सफाळे, ता. जि. पालघर - ४०११०२

राजगुरु पंडित विद्यालय माजी विद्यार्थी संघ, सफाळे 

अ) राजगुरू ह. म. पंडित विद्यालय सफाळे (पूर्वीचे नाव शारदा मंदिर माध्यमिक विद्यालय, सफाळे) च्या आजी व माजी विद्यार्थ्यांमध्ये तसेच आजी व माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये स्नेहबंध वाढविणे, संपर्कातून सहकार्याची भावना निर्माण करणे व याद्वारे सदर शाळा, तसेच आजी, माजी विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणे. 

आ) राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाचा उत्कर्ष करणे. 

इ) बुध्दीमान, अभ्यासु, गरजु तसेच होतकरूविद्यार्थ्यांना मदत करणे व त्यांच्या विकासासाठी सहकार्य / मदत करणे. 

ई) राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी व भरभराटीसाठी विविध योजना/कार्यक्रम/प्रकल्प राबविणे. 

उ) राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाचे परिसरात शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक काम करणे. 

ऊ) राजगुरू ह. म. पंडित विद्यालयांतील आजी व माजी शिक्षक शिक्षकेतरांचा गौरव करणे 

ए) राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाच्या व्यवस्थापन ज्या ग्रामिण शिक्षणसंस्थेकडे आहे त्या संस्थेस आर्थिक, शैक्षणिक व अन्य विविध मार्गांनी सहकार्य / मदत करणे. 

ऐ) राजगुरू ह. म. पंडित विद्यालय व ग्रामिण शिक्षण संस्था यांना त्यांना उद्दीष्ट पुर्ततेसाठी सर्व प्रकारे सहकार्य करणे. 

ओ) राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाच्या माजी विद्यार्थी व कर्मचारीवर्गाची कायमस्वरूपी माहीती/नोंदी (Record) ठेवणे. 

वाटचालीचा आढावा 


संस्थेची उद्दीष्टे

राजगुरू ह. म. पंडित विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या सन १९८४ ते २०१० पर्यंतच्या वाटचालीचा आढावा

राजगूरू ह. म. पंडित विद्यालय, म्हणजे मूळचे शारदा मंदिर विद्यालय सन १९५८ साली स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या शाळेतून सुमारे ११,००० विद्यार्थी शिकून आपल्या जिवनाची पुढील वाटचाल करीत आहेत. या माजी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सन १९८४ साली राजगुरू ह. म. पंडित विद्यालय माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून एक समिती नेमण्यात आली. 

माजी विद्यार्थी संघ पहिली समिती सन १९८४

श्री. यशवंत घरत -अध्यक्ष, श्री. खांतीलाल दोशी – उपाध्यक्ष, श्री. जयराम पाटील – कार्यवाह, श्री. वसंत नामजोशी- खजिनदार, सभासद – श्री. अकबर शेख, श्री. दीपक भाते, श्री. भद्रेश शाह, श्री. नवीन शाह, श्री. प्रकाश फडके, श्री. नैलेश शाह, श्री. नरेश जैन, श्री. नितीन गावकर, श्री. हरीष कोटी, श्री. धनंजय घरत, श्री. अनिल अमृते, सौ. प्रतिभा पाटील, श्री. हरिश्चंद्र भाते – आमंत्रित सल्लागार स्थापन झालेल्या समितीच्या सभासदांनी आपला कृतीशील सहभाग देऊन त्या वेळच्या शाळेच्या वाढीस मदत करण्याचे धोरण ठेवले. यातूनच त्याच वर्षी म्हणजे १९८४ साली शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांनी निधी गोळा करून एक वर्ग बांधून दिला. सुरवातीस माजी विद्यार्थ्यांनी श्रमदान, विटा, रेती, रोख रक्कम या स्वरूपात मदत करून आपल्या शाळेस मदत केली. मात्र माजी विद्यार्थी संघाचे कार्य काही काळ चालून नंतर खंडीत झाले. त्या नंतर काही वर्षांनी पुन्हा नव्या पिढीतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा माजी विद्यार्थी संघाचे काम वाढविण्याचा प्रयत्न केला व सन १९९८ साली नवीन अस्थायी समिती स्थापन करण्यात आली. 

२६ जानेवारी ९९रोजी स्थापन झालेली नवीन अस्थायी समिति

खांतीलाल दोशी अध्यक्ष, श्री. बिपीन शाह उपाध्यक्ष, श्री. दीपक भाते उपाध्यक्ष, श्री. उन्मेष कुलकर्णी सरचिटणीस, कै. अकबर शेख सहचिटणीस, श्री. भरत शहा खजिनदार, सभासद श्री. प्रविण राऊत, श्री. राजा ठाकूर, श्री. जीवन शेलार, श्री. मिलिंद भाते, श्री. नंदकुमार सुर्वे, श्री. सुनिल निंबकर, श्री. भद्रेश शहा, श्री. मनोहर निमकर, श्री. विक्रम फडके, श्री. ललीत पाटील, श्री. बकुल गजेरा, श्री. पंकज शहा, श्री. विलास पाटील, श्री. बिपीन पाटील, श्री. रमाकांत पाटील श्री. अरूण जाधव, श्री. चंद्रकांत बाबर, श्री. प्रशांत किणी, श्री. अनंत कुडू, कु. मुक्ती फडके, कु. वैशाली राऊत (नवले), कु. अरूणा कोटीयन, . श्री. महेश शिंत्रे, श्री. नितीन गावकर, कु. मनिषा चव्हाण, कु. दिप्ती शहा (गाडे), श्री. यशवंत घरत निमंत्रित, डॉ. नेताजी पाटील निमंत्रित, श्री. . . भाते निमंत्रित, श्री. पु. त्र्य. करांडे निमंत्रित.

नव्याने स्थापन झालेल्या अस्थायी समितीने शाळेचे मुख्याध्यापक संस्थेचे पदाधिकारी ह्यांच्याशी चर्चा करून शाळेसमोरील अडचणी समस्या जाणून घेतल्या शाळेस माजी विद्यार्थी संघामार्फत कशी कोणत्या प्रकारे मदत करता येईल ह्याचा उहापोह केला.