• +91 79723 63769
  • rajgurumvs1958@gmail.com
  • Saphale, Palghar, Maharashtra

राजगुरू ह. म. पंडित विद्यालय माजी विद्यार्थी संस्था सफाळे

राजगुरू ह. म. पंडित विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या सन १९८४ ते २०१० पर्यंतच्या वाटचालीचा आढावा

राजगूरू ह. म. पंडित विद्यालय, म्हणजे मूळचे शारदा मंदिर विद्यालय सन १९५८ साली स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या शाळेतून सुमारे ११,००० विद्यार्थी शिकून आपल्या जिवनाची पुढील वाटचाल करीत आहेत. या माजी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सन १९८४ साली राजगुरू ह. म. पंडित विद्यालय माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून एक समिती नेमण्यात आली.


माजी विद्यार्थी संघ पहिली समिती सन – १९८४

श्री. यशवंत घरत -अध्यक्ष, श्री. खांतीलाल दोशी – उपाध्यक्ष, श्री. जयराम पाटील कार्यवाह श्री. वसंत नामजोशी – खजिनदार, सभासद – श्री. अकबर शेख, श्री. दीपक भाते, श्री. भद्रेश शाह, श्री. नवीन शाह, श्री. प्रकाश फडके, श्री. नैलेश शाह, श्री. नरेश जैन, श्री. नितीन गावकर, श्री. हरीष कोटी, श्री. धनंजय घरत, अनिल अमृते, सौ. प्रतिभा पाटील, श्री. हरिश्चंद्र भाते – आमंत्रित सल्लागार

स्थापन झालेल्या समितीच्या सभासदांनी आपला कृतीशील सहभाग देऊन त्या वेळच्या शाळेच्या वाढीस मदत करण्याचे धोरण ठेवले. यातूनच त्याच वर्षी म्हणजे १९८४ साली शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांनी निधी गोळा करून एक वर्ग बांधून दिला. सुरवातीस माजी विद्यार्थ्यांनी श्रमदान, विटा, रेती, रोख रक्कम या स्वरूपात मदत करून आपल्या शाळेस मदत केली. मात्र माजी विद्यार्थी संघाचे कार्य काही काळ चालून नंतर खंडीत झाले. त्या नंतर काही वर्षांनी पुन्हा नव्या पिढीतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा माजी विद्यार्थी संघाचे काम वाढविण्याचा प्रयत्न केला व सन १९९८ साली नवीन अस्थायी समिती स्थापन करण्यात आली. 


२६ जानेवारी १९९८ रोजी स्थापन झालेली नवीन अस्थायी समिती.

श्री. खांतीलाल दोशी – अध्यक्ष, श्री. बिपीन शाह – उपाध्यक्ष, श्री. दीपक भाते उपाध्यक्ष, श्री. उन्मेष कुलकर्णी – सरचिटणीस, कै. अकबर शेख – सहचिटणीस, श्री. भरत शहा खजिनदार, सभासद श्री. प्रविण राऊत, श्री. राजा ठाकूर, जीवन शेलार, श्री. मिलिंद भाते, श्री. नंदकुमार सुर्वे, श्री. सुनिल निंबकर, श्री. भद्रेश शहा, श्री. मनोहर निमकर, श्री. विक्रम फडके, श्री. ललीत पाटील, श्री. बकुल गजेरा, श्री. पंकज शहा, श्री. विलास पाटील, श्री. बिपीन पाटील, श्री. रमाकांत पाटील श्री. अरूण जाधव, श्री. चंद्रकांत बाबर, श्री. प्रशांत किणी, श्री. अनंत कुडू, कु. मुक्ती फडके, कु. वैशाली राऊत (नवले), कु. अरूणा कोटीयन, . श्री. महेश शिंत्रे, श्री. नितीन गावकर, कु. मनिषा चव्हाण, कु. दिप्ती शहा (गाडे), श्री. यशवंत घरत – निमंत्रित, डॉ. नेताजी पाटील – निमंत्रित, श्री. ह. श. भाते निमंत्रित, श्री. पु. त्र्य करांडे – निमंत्रित.

नव्याने स्थापन झालेल्या अस्थायी समितीने शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिकारी ह्यांच्याशी चर्चा करून शाळेसमोरील अडचणी व समस्या जाणून घेतल्या व शाळेस माजी विद्यार्थी संघामार्फत कशी व कोणत्या प्रकारे मदत करता येईल ह्याचा उहापोह केला.

सन १९९८-९९ या वर्षात माजी विद्यार्थी संघाने विशेष लक्ष देऊन राजगुरू ह.म. पंडित विद्यालयाच्या इमारतीची डागडुजी, प्लास्टरींग, पाच वर्गांना लाद्या बसविणे, गच्चीवरील कोबा बनविणे, पंडित विद्यालयाच्या इमारतीची आतून बाहेरून रंगरंगोटी करून देणे इ. कामे सुमारे अडीच लाख रूपये खर्च करून पूर्ण करून दिली. या कामी अनेक माजी विद्यार्थ्यांनी पैसा व वस्तुंच्या रूपाने मदत केली.

सन २०००-२००१ मध्ये राजगुरु ह. म. पंडित विद्यालयाच्या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण व वाढ करतांनाही माजी विद्यार्थी संघातर्फे माजी विद्यार्थी श्री. प्रविण म. राऊत, श्री. मिलिंद ह. भाते व रमेश चं. कोटी यांनी एकत्रितपणे सुमारे एक लाख रूपये खर्चुन पुरेशा मुताऱ्या व संडास वाढविण्यात आले. त्याच स्वच्छतागृहास जोडून शासकिय अनुदानातून बांधण्यात आलेल्या गोबरगॅस प्लांटचा खड्डा खडकाळ जमिनित खोदण्यासाठी माजी विद्यार्थी संघाने रु.५०,०००/- एवढा खर्च केला.


तसेच माजी विद्यार्थी श्री. वालजी देवजी शहा आणि लखमशी देवजी शहा यांच्या कुटुंबियांनी राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाला एक वर्ग बांधून दिला. इंग्लिश मिडियम स्कूलच्या इमारतीसाठी पंडित हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. इंद्रमल जैन व श्री. शोभालाल राठोड बंधु तसेच श्री. घासीलाल मगनलाल कुटुंबियांनी आर्थिक सहकार्य मिळवून दिले. तसेच श्री. खांती दोशी व श्री. शांती शहा यांनी आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे कार्यालय व स्टाफरूम बांधण्यासाठी आर्थिक मदत केली.

पालघर तालुक्याच्या तेव्हाच्या आमदार व राज्यमंत्री मा. सौ. मनिषाताई निमकर यांनीही शाळेस आपल्या आमदार निधीतून सुमारे दोन लाख रूपये निधी उपलब्ध करून दोन वर्ग बांधून दिले. अर्थात ही सर्व कामे आपल्या सारख्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेबाबतच्या प्रेमातून केलेल्या मदतीमुळेच होऊ शकली.


ग्रामिण शिक्षण संस्था, सफाळे व राजगुरू ह. म. पंडित विद्यालय, सफाळे यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात संस्थेने “सुवर्णमहोत्सवाची वाटचाल” ही ७६ पानी स्मरणिका प्रसिद्ध केली. या स्मरणिकेच्या छपाई खर्चासाठी आपल्या माजी विद्यार्थी संघाने मोठे आर्थिक सहाय्य केले. त्यामुळे या स्मरणिकेत एकही जाहिरात न घेता संस्थेने ७६ पानी स्मरणिका माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहाय्यातून छापली. याच सुवर्ण महोत्सवी वर्षात ग्रामिण शिक्षण संस्था व आपल्या माजी विद्यार्थी संघाने संयुक्तरीत्या दि. २७/०४/२००८ रोजी माजी विद्यार्थी व शिक्षकांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्यात पंडित हायस्कूलच्या सर्व माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या स्नेहसंमेलनात वर्गवार संमेलने भरवण्याचा हेतू होता. पण अपेक्षेपेक्षा उपस्थिती कमी होती. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या उत्कर्षासाठी काय करता येईल याची मांडणी आपल्या भाषणांत केली. मार्च १९८१ च्या एस.एस.सी. बॅचच्या वतीने बोलताना सौ. मनिषा राऊत (चौबळ) हीने आपल्या बॅचमार्फत शाळेस एक वर्ग बांधून देण्याचे आश्वासन दिले. तर मार्च १९७७ च्या बॅचतर्फे श्री. मिलिंद भाते यांनी इंग्रजी माध्यमाचे शाळागृहात नाट्यगृह उभारून देण्याचे आश्वासन दिले. माजी शिक्षक श्री. दास्ताने सर, श्री. सि.म. पाटील सर इ.ची प्रेरणादायी भाषणे झाली. सर्वांनीच माजी विद्यार्थी संघाच्या वाटचालीस शुभेच्छा
दिल्या.


माजी विद्यार्थी संघातर्फे सदर कामे सुरू असतानाच सदर समितीने माजी विद्यार्थी संघाच्या कार्यात नवीन माजी विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून नवीन समिती नेमण्याचे ठरविले व त्यानूसार १६ नोव्हेंबर २००८ रोजी नूतन कार्यकारिणी नेमण्यात आली.


१६ नोव्हे. २००८ रोजी स्थापलेली माजी विद्यार्थी संघाची नूतन कार्यकारिणी डॉ. नेताजी पाटील – अध्यक्ष, श्री. कल्पक वर्तक – उपाध्यक्ष, श्री. भारती बनसोडे – उपाध्यक्ष, श्री. रमाकांत पाटील – कार्याध्यक्ष, श्री. राजकुमार राऊत – सरचिटणीस, कल्पना म्हात्रे (राऊत) – सहचिटणीस, श्री. रमाकांत घरत – सहचिटणीस, श्री. ललीत पाटील – सहचिटणीस, श्री. रवि शिवदे खजिनदार, सभासद – कु. चित्रा राईलकर, कु. गीता पाटील, कु. मुक्ती फडके, श्री. धनंजय आकरे, श्री. महेंद्र पाटील, श्री. महादेव जाधव, श्री. मुकुंद निंबकर, श्री. मिलिंद भाते, श्री. अस्लम शेख, श्री. अनंत कुडू, श्री. बंटी शहा, श्री. महेंद्र राजपूत, श्री. उन्मेष कुलकर्णी, श्री. जीवन शेलार, श्री. काशीनाथ वरठा, श्री. महेंद्र छेडा, श्री. संतोष राऊत, श्री. पंकज शहा, श्री. अश्विनीकुमार राणे, श्री. नितीन वर्तक, श्री. अभिजीत कुलकर्णी, श्री. महेंद्र राजपुत, श्री. इरफान शेख, श्री. अनिल घरत, श्री. मेघा राऊत, श्री. शरद घरत, श्री. जतीन कदम, श्री. रविंद्र निंबकर – आमंत्रित, श्री. मोतिराम पाटील आमंत्रित, सहकारी सभासद – श्री. एल. जी. चौधरी, श्री. सोपान पाटील, श्रीम. साधना कुळकर्णी, श्री. अनिल चौधरी, संस्थेकडून – श्री. यशवंत घरत- अध्यक्ष, श्री. खांतीलाल दोशी – कार्याध्यक्ष, श्री. दिपक भाते – सरचिटणीस, श्री. भरत शहा खजिनदार, सन्मानीय / हितचिंतक – श्री. प्रविण राऊत.


नव्या कार्यकारिणीनेही आपले काम वाढविण्याच्या दृष्टीने दरवर्षी २६ जानेवारीला माजी विद्यार्थी व शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्याचे तसेच मे महिन्यांत १० वी परीक्षेस बसलेल्या सफाळे परिसरांतील विद्यार्थ्यांना व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे दिनांक २१ जून २००९ रोजी मार्च २००९ च्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी संघातर्फे पहिले विनामुल्य व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून तज्ञ समुपदेशक म्हणून श्री. गिरीष वाळींबे व श्री. सुभाष महाजन ह्यांना निमंत्रित करण्यात आले होते. हे मार्गदर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील ११ शाळांमधील इयत्ता १० वी च्या परीक्षेस बसलेले सुमारे ४०० विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.


राजगुरु ह. म. पंडित विद्यालयातील मार्च २००९ च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा झेरॉक्स (तीन लिव्हींग सर्टिफिकेट व तीन गुण पत्रक) आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री. नितीन वर्तक यांच्या सौजन्याने माजी विद्यार्थी संघातर्फे विनामुल्य वाटप करण्यात आल्या तसेच ह्या झेरॉक्स तातडीने अटेस्टेड करून देण्याची व्यवस्थाही करण्यात आली.


माजी विद्यार्थी संघाने या पुढे नियमित काम सुरू ठेवल्यास माजी विद्यार्थी संघाच्या संघटनात्मक बांधणीसाठी खालील माजी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रमाणे निधी देण्याचे आश्वासन मिळाले व त्याप्रमाणे दरवर्षी खालील माजी विद्यार्थ्यांकडून असा निधी मिळू लागला आहे.

डॉ. नेताजी पाटील – रु.१,०००/-, अॅड. दीपक भाते – रु.१,०००/-, श्री. खांती दोशी – रु.१,०००/-, श्री. नितीन वर्तक – रु.१,०००/-, श्री. रमाकांत पाटील रु.१,०००/-, श्री. महादेव जाधव – रु.१,०००/-, श्री. राजनकुमार राऊत – रु.१,०००/- श्री. अभिजीत कुलकर्णी – रु.१,०००/-, श्री. भरत शहा – रु.१,०००/-, श्री. नितीन दोशी रु.१,०००/-, श्री. रवि का. शिवदे – रु.१,०००/-, श्री. ललीत ज. पाटील रु.५००/-, श्री. बकुल ल. शहा – रु.१,०००/-

२६ जानेवारी २०१० रोजी माजी विद्यार्थी व माजी शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे मा. श्री. एन. के. पाटील (बोर्डी हायस्कूल मा. विद्यार्थी संघ अध्यक्ष) हे होते. ह्या कार्यक्रमामध्ये अनुक्रमे श्री. वसंत तरे, श्री. युसूफ पटेल, श्रीमती कल्पना राऊत (म्हात्रे) व गितेश पाध्ये ह्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच विरार-चर्चगेट ७.३१ च्या लोकल ग्रुप कडून शाळेतील अपंग विद्यार्थ्यांना तीन व्हील चेअर वाटप करण्यात आल्या. यावेळी श्रीमती कल्पना राऊत (म्हात्रे) यांच्या एस.एस.सी. बॅच मार्च १९७५ यांच्याकडून माजी विद्यार्थी संघास रु.४५,०००/- रोख देणगी मिळाली. तसेच श्री. युसूफ पटेल यांनी रु.११,१११/- तर श्री. वसंत तरे यांच्या कडून रु.१०,०००/- देणगी मिळाली. १९७१ च्या एस.एस.सी.च्या बॅचकडून आत्तापर्यंत रु.१८,००२/- माजी विद्यार्थी संघास देणगीच्या स्वरूपात मिळाले. मेळाव्या नंतर संध्याकाळी माजी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


 दिनांक १३ जून २०१० रोजी मार्च २०१० च्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी संघातर्फे दुसरे विनामुल्य व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून श्री. सुभाष महाजन व श्री. प्रशांत सोनवणे उपस्थित होते. या समारंभासही सुमारे ३५० – ४०० विद्यार्थी उपस्थित होते. राजगुरू ह. म. पंडित विद्यालयातील मार्च २०१० च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा झेरॉक्स (तीन लीव्हींग सर्टफिकेट व तीन गुण पत्रके) आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री. नितीन वर्तक यांच्या सौजन्याने माजी विद्यार्थी संघातर्फे विनामुल्य वाटप करण्यात आल्या. तसेच झेरॉक्स अटेस्टेड करून देण्याची व्यवस्था करण्यात आली.


आपल्या शाळेतील गरजू अपंग विद्यार्थ्यांसाठी श्री. मोतीराम पाटील सरांनी रु.१०००/- मदत निधी दिला. माजी विद्यार्थी श्री. अभिजित कुलकर्णी यांने शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानपत्रिका मासिक व युनिक फिचर्सची प्रेरणादायी पुस्तके शाळेच्या वाचनालयाला देणगी दिली. हा अहवाल छपाईचा खर्च श्रीमती भारती बनसोडे यांच्या सौजन्याने करण्यात आला. आपल्या शाळेतील मार्च १९७७ च्या एस. एस. सी. बॅच ने आपल्या शाळेसाठी रंगमंच तयार करण्याचे काम हाती घेतले असून ते पूर्ण ते होण्याच्या मार्गावर आहे.